दरवर्षी प्रमाने कुकडी पानीसाठी अंदोलन 2012

कुकडीच्या पाण्याचा पंचनामा करण्याचे प्रांताचे आदेश - ग्रा. प. पदाधिकाऱ्याचे उपोषण मागे साठीचे

कर्जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेरवडी तलावामध्ये कुकडीचे पाणी सोडावे या मागणीसाठी कर्जत ग्रा. पं. चे सरपंच सौ सुनंदा पवार व उपसरपंच नामदेवराव राउत यांचे नेतृत्वाखाली कर्जत तह्शील कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरु केले त्यांना उपविभागीय अधिकारी संदीप कोकडे यांनी भेट देऊन चर्चा केली .

                कर्जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेरवडी तलावामध्ये कुकडीचे पाणी गरजेपुरते  न  सोडता कमी सोडल्यामुळे कर्जतकरांना १० दिवसच पाणी पुरवठा करता येईल त्यानंतर भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल. म्हणून कुकडीचे पाणी थेरवडी तलावात सोडण्यात यावे अशी मागणी करत आदोलन सुरु करण्याचे निवेदन दिले गेले होते परंतु कुकडीचे पाणी ३ दिवस अगोदरच बंद करण्यात आल्याने आंदोलकांनी कुकडीचे किती पाणी आले याचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी संदीप कोकडे यांचे कडे केली असता त्यांनी लगेच त्या पद्धतीने पंचनाम्याचे आदेश दिले याशिवाय डी ११ एप्रिल रोजी तहसीलदार कुकडीचे श्रीगोंदा व कोलवडी चे अधिकाऱ्याची कर्जत तहसील कार्यालयामध्ये बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात सरपंच सौ सुनंदा पवार, उपसरपंच नामदेवराव राउत यांचे नेतृत्वाखाली ग्रा. पं. सदस्य अमृत काळदाते, अनिल गदादे, राजू सय्यद, सचिन सोनमाली,यांचे सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातमी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा